सट्टेबाजी अन् जुगाराशी संबंधित ऑनलाईन गेमवर केंद्राची बंदी;लागू केले नवे नियम
नवी दिल्ली – देशात सध्या मोबाइलवरुन सट्टेबाजी आणि जुगारांशी संबंधित गेम्सचे फॅडवाढले आहे. मोठा वर्ग या गेम्सच्या आहारी गेला आहे. या गेम्सवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नव्हते. मात्र, केंद्र सरकारने या गेम्सबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. यामुळे या गेम्सला चाप बसणार आहे.*
*👉🟥🟥👉मोबाइलवरुन सट्टेबाजी आणि जुगारांशी संबंधित गेम्सचे फॅडवाढले आहे. मोठा वर्ग या गेम्सच्या आहारी गेला आहे. या गेम्सवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सट्टेबाजी, ऑनलाईन गेमिंग आणि जुगाराच्या जाहिरातीं विरुद्ध सूचना प्रसारित करण्यात आल्या असून ऑनलाईन गेमिंस संदर्भातील जाहिराती प्रसारित न करण्याचा सूचना प्रसार माध्यमांना देण्यात आल्या आहेत.*
*👉🔴🔴👉ऑनलाइन गेम्स सट्टेबाजीचे नवे माध्यम बनले आहे. याच्या जाहिराती सर्रास पाहायला मिळतात. अनेक नागरिक मोबाइलच्या माध्यमातून सट्टा खेळतात. भारतात सट्टेबाजीवर बंदी आले. असे असतांना या नव माध्यमामुळे कारवाई करता येत नव्हती. या साठी नियमावली देखील नव्हती. यामुळे केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचा सट्टा आणि जुगाराला मनाई करण्यात आली आहे.या वर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबतची माहिती दिली. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांची यापुढे केवायसी पडताळणी करणे बंधनकारक राहणार आहे. माध्यमसंस्थांसाठी देखील काही मार्गदर्शक तत्व बनवण्यात आली असून या गेम्सच्या जाहिराती वर्तमानपत्रं आणि अन्य काही प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे.*
*👉🟥🟥👉केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर या बाबत म्हणाले, की आम्ही रचना तयार करत आहोत. या माध्यमातून एसआरओद्वारे कोणत्या ऑनलाईन गेमला परवानगी देणं योग्य असेल, हे ठरवले जाईल. ऑनलाईन गेमला मान्यता देण्याचा निर्णय या गेममध्ये कोणत्याही प्रकारे बेटिंग किंवा जुगाराचा समावेश नाही, हे लक्षात घेऊन घेण्यात येईल. ऑनलाईन गेमवर बेट लावली जात असल्याचंआढळल्यास, तो त्यास मान्यता देणार नाही. ऑनलाईन गेमिंग ही स्टार्टअपसाठी मोठी संधी म्हणून उदयास आली आहे. नव्या नियमांमुळे त्यांच्या परवानगीबाबतची संदिग्धता दूर होणार आहे.*