21 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान पुण्यात रंगणार रोलबॉल ची अंतरराष्ट्रीय स्पर्धा – मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

स्पर्धेच्या मानचिन्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील व क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन*.

येत्या 21 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान पुण्यात श्री शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे रोलबॉल ची अंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पर्धा समितीचे अध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. आज मुंबईत ह्या स्पर्धेच्या मानचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्पर्धेचे प्रमुख ना. चंद्रकांतदादा पाटील,क्रीडा मंत्री गिरीष महाजन, रोलबॉल ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, रोलबॉल संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर, उपाध्यक्ष ऍड.अमोल काजळे पाटील,मुंबई रोलबॉल संघटनेचे सचिव जयप्रकाश सिंग आणि चंदन जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चंद्रकांतदादांनी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्री महोदयांना स्पर्धेच्या उदघाट्न व समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले, ते त्यांनी स्वीकारले तसेच स्पर्धेला सर्वतोपरी मदत करू असे वचन ही दिले.आत्तापर्यंत ह्या स्पर्धेसाठी 32 देशांनी सहभाग नोंदविला असून त्यांची व्हिसा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असल्याचे राजू दाभाडे व संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
ह्या स्पर्धेचा जन्म पुण्यात झाला असल्यामुळे व आता तब्ब्ल 57 देशात हा वेगवान खेळ खेळला जात असल्याने त्याची पुण्यात होणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे पुण्याचा पालकमंत्री आणि संयोजन समितीचा अध्यक्ष ह्या नात्याने माझे कर्तव्य असल्याचे मी मानतो असे मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. ह्या स्पर्धेसाठी क्रीडानगरी मधील बॅडमिंटन हॉल सुसज्ज करत असून जगभरातून येणाऱ्या स्पर्धकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असल्याचेही मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, महाराष्ट्र रोलबॉल संघटना.
मो – 9850999995

छायाचित्र 1 व 2 मानचिन्ह प्रकाशन.
छायाचित्र 3 – मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना स्पर्धेची माहिती देताना ना. चंद्रकांतदादा पाटील.