Gujarat :-

2002च्या दंगलीतील हिंसाचार आणि सामूहिक बलात्काराच्या 26 आरोपींची गुजरात येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींवर 2002मध्ये कलोल येथे वेगवेगळ्या अल्पसंख्याक समुदायाच्या 12 हून अधिक लोकांची हत्या आणि सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.*

*👉🟥🟥👉या हिंसाचारात एकूण 39 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील 13 जणांचा या खटल्यादरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुद्धचे खटले बंद करण्यात आले. पंचमहल जिल्ह्यातील हलोल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश लीलाभाई चुडासामा यांनी उर्वरित 26 जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.*

*👉🔴🔴👉27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथील साबरमती ट्रेनला लागलेल्या आगीनंतर बंदच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्च्यादरम्यान जातीय दंगली उसळल्या होत्या. त्या गटात हे सर्व आरोपी सहभागी होते. मात्र, त्यांच्याविरुद्ध थेट हिंसाचाराचा कोणताही पुरावा न मिळाल्याचं म्हणत न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!