तेलंगणा – महाराष्ट्र सीमावर्ती भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.1 रिक्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र तेलंगणा राज्यातील कागदनगर जवळील दहेगाव होते. या भूकंपाची नोंद नागपूर येथील भूकंप मापक केंद्रात झाली आहे. या धक्क्यात जीवित वा कुठलीही वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.*

*विद्यार्थी धास्तावले*

गोजोली येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी भूकंपाचे धक्के अनुभवले. लगेच विद्यार्थी वर्गाबाहेर पडले. मात्र या परिसरात विहिरीचे बांधकाम सुरु आहे. अधून मधून विहिरीसाठी स्फोट केले जातात. त्यामुळे हे हे धक्के जाणवले असावेत, असं शिक्षकांना वाटलं होतं.

*काय म्हणतात अभ्यासक*

तेलंगणा राज्यात कागजनगर तालुक्यातील दहेगाव जवळ 3.1 रिक्टर स्केलचा भूकंप झाला.हा भूकंप जमिनीत 5 कि.मी. च्या आंत झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणा राज्य हे भूकंपप्रवण क्षेत्र असून इथे दरवर्षी 2 ते 4 रिक्टर स्केलचे भूकंप होत असतात . लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात हे धक्के जाणवतात. गोदावरी क्षेत्र हे भूकंप धोका दोन आणि तीन प्रकारात मोडते. त्यामुळे इथे अधून मधून भूकंप होत असतात, असे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

*गडचिरोली जिल्ह्यात जाणवले धक्के*

चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येणाऱ्या महागाव येथेही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिली.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!