img 20230311 wa0032

इंदापूर वकील संघटनेच्या वतीने
पुणे जिल्हा बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांचे मोजणी आणि त्या संदर्भातील सर्व परिपत्रके याविषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी एडवोकेट पांडुरंग थोरवे यांनी सम्राट अशोक यांच्या कालखंडापासून ते आजच्या आजच्या 2023 पर्यंतच्या तंत्रज्ञान युगातील मोजणीबाबत तसेच अलीकडच्या काळातील ड्रोन व जीपीएस तंत्रज्ञान मार्फत होणाऱ्या मोजणी, सॅटॅलाइट मोजणी त्या संदर्भातील नवीन नियम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास इंदापूर न्यायालयाचे न्यायाधीश पी.एल. पाटील, न्यायाधीश के.सी. कलाल, न्यायाधीश श्रीमती एस.डी. वडगांवकर, श्रीमती एस.एस. साळुंखे, न्यायाधीश श्रीमती जे.बी. खटावकर यांसह सरकारी वकील गौरी कस्तुरे, वरिष्ठ महिला वकील श्रीमती खबाले, इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. मनोहर चौधरी व सचिव ऍड. आशुतोष भोसले व इंदापूर बारचे वकील तसेच जिल्हा परिषद संघटनेचे वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!