सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

*मुंबई :- जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून प्रिया निखिल पै व पणतू यश पै असा परिवार आहे.*

*🙏💐शारदा माईंच्या महानिर्वाणामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद सदैव लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.*