संपादकिय:-
*देशात कोरोनाचा संसर्ग घटचाना दिसत आहे मात्र धोका कायम आहे.देशात आज 214 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 228 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 14 रुग्णांची घट झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण घटताना दिसत असेल तरी, कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या XBB आणि BF.7 या सब-व्हेरियंटचे रुग्ण देशात वाढताना दिसत आहे. देशात सध्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर नवीन BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत.*
*👉🟥👉मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित*
*मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी नऊ जणाना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन BQ 1.1 या सब व्हेरियंटचे रुग्ण आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनंतर 24 डिसेंबरपासून आरटीपीसीआर कोरोना चाचणी परदेशातून आलेल्या नागरिकांची केली जात आहे.*
*👉🅾️👉11 कोविड नमुने NIV तपासणीसाठी पाठवले*
*राज्य सरकारच्या दैनंदिन कोविड अपडेटनुसार, मुंबईतील चारसह एकूण 11 कोविड-पॉझिटिव्ह नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत.यापैकी, दोन रुग्णांना BQ.1.1 व्हेरियंटची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा मिळाला. या दोन रुग्णांमध्ये गोव्यातील एक 16 वर्षांचा मुलगा आणि नवी मुंबईतील एक 25 वर्षांची महिलेचा समावेश आहे. इतर नऊ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.*
*👉🅾️👉ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?*
*जगभरात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढवणाऱ्या बीएफ.7 आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे चा भारतातही शिरकार झाला आहे. भारतात बीएफ.7 व्हेरियंटचे सात आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे सात आणि BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत XBB व्हेरियंट आणि चीन, जपानमध्ये BF.7 व्हेरियंटचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले आहे.*
*👉🟥👉सर्दी, ताप नाही ‘ही’ आहेत नवीन लक्षणे*
*रिपोर्टनुसार, कोरोना रुग्णांमध्ये मागील काही महिन्यामध्ये आढळलेल्या खालील प्रमाणे लक्षणे दिसून आली. यामध्ये काही लक्षणे पूर्वीप्रमाणे सारखीच होती, तर काही लक्षणे नवीन असल्याचे दिसून येत आहे. घसा खवखवणे, डोकेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, नाक वाहणे, थकवा येणे, शिंका येणे, रात्री घाम येणे ही नवीन लक्षणे आढळली आहेत.*