संपादकिय:- रामवर्मा आसबे

*नवी दिल्ली :-कोरोनाची आतापर्यंतची सर्वात घातक लाट चीनमध्ये आली आहे. दररोज लाखो नवे रुग्ण येत असल्याने रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीये, तसेच औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. लोक औषधांशिवाय त्रस्त आहेत.आपला शेजारी संकटात सापडलेला पाहून भारत पुन्हा एकदा समोर आला आहे.*

*👉🅾️👉भारताने चीनला औषधे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या औषध निर्यात संस्थेच्या अध्यक्षांनी गुरुवारी (२२ डिसेंबर) सांगितले की, ‘जगातील सर्वात मोठ्या औषध उत्पादकांपैकी एक असलेल्या भारताने कोरोनाशी लढा देणाऱ्या चीनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत चीनला तापाची औषधे देण्यास तयार आहे.’ चीनमध्ये कोरोनाच्या लाटेमुळे औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी औषध कंपन्यांमध्ये ओव्हरटाईम केला जात आहे. ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीवर मोफत औषधे देण्याची घोषणा चीन सरकारने केली आहे.*

*👉🔴👉दरम्यान, तापावरील औषधे चीनला पाठवण्यासही भारताने परवानगी दिली आहे. फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे (फार्मेक्सिल) अध्यक्ष साहिल मुंजाल यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना चीनकडून ऑर्डर मिळत आहेत.”भारत सरकारने औषध पाठवण्याची परवानगी दिली“आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉलची सध्या चीनमध्ये जास्त मागणी आहे, जिथे लोकांना या औषधांचा तुटवडा जाणवत आहे,” त्याचवेळी भारत चीनला मदत करण्यास तयार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “आम्ही चीनमधील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.” चीनला औषध पाठवण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “जगातील फार्मसी म्हणून आम्ही इतर देशांना नेहमीच मदत केली आहे.”*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!