अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम ही संस्था सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर काम करते एक जुलै 2016 पासून या संस्थेने आपल्या कामाला सुरुवात केली आणि आज पर्यन्त साडेचार लाखापेक्षा जास्त लाभार्थीना सरकारी योजना मिळवून देण्यात अनुलोमला यश मिळाले आहे. याच बरोबरीने अनेक शासकीय योजनांमध्ये सरकारच्या मदतीला जनसहभागाची साथ देण्याचे मोलाचे काम अनुलोमने वेळोवेळी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील नागनाथ नामदेव पवार हे सध्या कर्करोगाने ग्रस्त असून सोलापूर येथे उपचार घेत आहेत, उपचारासाठी लागणार खर्च अधिक असल्याने त्यांनी आपल्याला शासकीय योजनेतून मदत मिळावी या हेतूने अनुलोमचे इंदापूर तालुका प्रमुख गोरख माने यांच्याकडे आपली व्यथा मांडली, श्री माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पवार यांची कागदपत्रे गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सोमवार दिनांक 5 डिसेंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे अनुलोमच्या रचनेतून प्रकरण जमा केले व चारच दिवसात अर्थात 9 डिसेंबर रोजी रुग्णाला 1 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून करण्यात आली.
शनिवार दिनांक 10 डिसेंबर रोजी इंदापूर येथे रुग्णाचे पुतणे श्री विशाल पवार यांचेकडे मदतीचे पत्र सुपूर्द करण्याचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमात नागनाथ पवार यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी अनुलोम (slim) चे महाराष्ट्राचे सोशल मीडिया प्रमुख श्री शैलेन्द्र ठकार, अनुलोमचे इंदापूर तालुका प्रमुख श्री गोरख माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंदापूर तालुका कार्यवाह श्री नाना घळके सर, पत्रकार सुरेशराव जकाते, संदीपजी सुतार याच बरोबरीने अनुलोमचे वस्तीमित्र श्री प्रवीण सलगर, श्री देवरज दूटाळ, श्री मछिंद्र खरात, श्री शहाजी सरडे, श्री प्रेमकुमार जगताप, श्री मयूर कळसाईट व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!