महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे दोन्ही मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे पत्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पाठवले आहे. त्यामुळे हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.*

*👉🅾️👉कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सचिवांना मंत्र्यांना बेळगावात पाठवू नये, अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे पत्र पाठवण्यात आले आहे. सध्या सीमावाद प्रश्नावर तणाव असल्याने येणे टाळावे, असे कर्नाटकने म्हटले आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली आहे. मात्र, महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत.*

*👉🈲👉यावरच मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला याबाबत कुठलाही फॅक्स मिळाला नाही. मी 3 तारखेला जाणार होतो मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे बेळगावात खूप कार्यक्रम होतात, त्यामुळे मी सहा तारखेला जाणार आहे. मात्र, या तारखेलाही बरेच कार्यक्रम आहेत. त्यामुळे आम्ही चिथावणी नाही तर समन्वयाने भेटायला आणि बोलायला येत आहोत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.*

*👉🔴👉कर्नाटकने जत तालुक्याला पाणी सोडले:-*

*दरम्यान ,शिंदे सरकार म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेत आहे, तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 2000 कोटींचे टेंडर काढणार असल्याची घोषणाही शिंदे सरकारने केली आहे. यासाठी सरकार बैठकाही घेणार आहे. तर याचवेळी कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजना सुरू करून जत तालुक्यात नैसर्गिक प्रवाहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सीमेपासून तीन किलोमीटरवर असलेला तिकोंडी तलाव गुरुवारी भरून वाहू लागला आहे. कर्नाटकचे तिकोंडी गावाने समर्थन केल्यानंतर हे पाणी सोडून या परिसराला खुश करण्याचा कर्नाटकचा प्रयत्न असल्याचे आता म्हटले जात आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!