गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान; 👉🅾️👉89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात

*👉🟪👉गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे.आज पहिल्या टप्प्यात एकूण 2,39,76,760 मतदार मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ 6 उमेदवार उभे केले आहेत.*

*👉🅾️👉दोन टप्प्यात मतदान -*

*गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.*

*👉🟪👉2017ची निवडणूक झाली होती चुरशीची*

*मागच्या वेळच्या म्हणजेच 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरस पाहायला मिळाली होती. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं पण तरीही तो सामना चुरशीचा झाला होता. भाजपनं 99 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं 80 जागांवर विजय मिळवला होता. 2017 ला बहुमत भाजपला मिळालं असलं तरी काँग्रेसनं भाजपला कडवी झुंज दिली होती, असं म्हणता येईल. गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे. यंदा भाजपसमोर काँग्रेससह आपनं देखील आव्हान उभं केलं आहे.*

*👉🅾️👉पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा रोड शो*

*पहिल्या टप्प्याचं मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हा रोड शो असेल. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी 10.30 वाजता रोड शो करतील.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!