जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न.

होम मिनिस्टर कार्यक्रमास गावातील महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मिळवले बक्षीस.

संपादकीय:-
इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने नवदुर्ग चा सन्मान म्हणून कै. सौ. छायाताई ब्रह्मदेव गवळी यांच्या स्मरणार्थ होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभाग दर्शवला.
या कार्यक्रमांमध्ये प्रथम बक्षीस म्हणून पैठणी साडी सौ. पूजा प्रवीण देवकर यांनी पटकावले. द्वितीय बक्षीस कांजीवरम साडी सौ दिपाली सचिन पवार यांनी मिळवली तसेच तृतीय बक्षीस सोन्याची नथ सौ. रेखा राजेंद्र चंदनशिवे यांनी मिळवली तर उत्तेजनार्थ बक्षीस डिनर सेट करिष्मा अफसर शेख यांनी पटकावली. या कार्यक्रमात विविध प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना काही बक्षिसे यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमाचे नियोजन गावचे सुपुत्र हरिदास गवळी यांनी केले होते. त्यास उत्तम निवेदक म्हणून अनिल रुपनवर- पाटील यांची अतिशय मोलाची साथ मिळाली. त्यामुळे महिलांना मनोसक्त खेळामध्ये भाग घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे खेळ खेळणे सुलभ होत होते. ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
होम मिनिस्टर हा कार्यक्रम ग्रामीण भागातील वडापुरी च्या जय भवानी मित्र मंडळ यांनी आयोजित केल्याने गावातील लहान थोर यांनी या मित्र मंडळाचे व आयोजकांचे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे कौतुक केलेले दिसून आले.

कै. सौ. छाया ब्रह्मदेव गवळी यांच्या स्मरणार्थ जय भवानी मित्र मंडळ आयोजित खास महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर उत्सव नवरंगाचा उत्सव आदिशक्तीचा या कार्यक्रमासाठी प्रथम बक्षीस ज्योती तात्यासाहेब राजगिरे यांच्या वतीने पैठणी साडी, द्वितीय बक्षीस रेणुका अक्षय बागल कांजीवरम पैठणी, तृतीय बक्षीस सोनाली शरद कामटे सोन्याची नथ ,उत्तेजनार्थ बक्षीस आरती प्रीतमकुमार देवकर डिनर सेट अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती सदर बक्षीसे देणाऱ्यांचे जय भवानी मित्र मंडळ वडापुरी यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमास हनुमंत केवारे, संजय तोबरे,सचिन पवार, दीपक पवार,अमोल पवार,हरिदास काकडे, अलिअहमद (भैया )शेख, आदित्य देवकर, अविनाश देवकर, रामकृष्ण तपासे, आकाश जगताप, धनंजय नलवडे, अस्लम शेख, सौरव नलवडे,अप्पा काटे, माऊली तोबरे चंद्रकांत जाधव,पंकज जाधव, अभिजीत जाधव, सौरव जाधव,निलेश शेलार, दत्तात्रय केवारे यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल कदम यांनी केले तर आभार तात्यासाहेब राजगिरे सर यांनी मांडले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!