भारतीय जनता युवा मोर्चा कडुन युक्रेनहुन परतलेल्या शुभम पाडुळेच स्वागत

भारतीय जनता युवा मोर्चा .
युक्रेनहुन परतलेल्या शुभम पाडुळेच स्वागत… !

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकारची #Operation Ganga ही विशेष मोहीम सुरू होती. याच माध्यमातून युक्रेनला शिक्षण घेत असलेला कालठण नं 2 येथील शुभम पाडुळे हा विद्यार्थी आपल्या घरी परतला. या विध्यार्थीची विचारपूस करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मा. मोदीजींच्या कार्यतत्परतेमुळे हजारो विद्यार्थी सुरक्षित पोहोचले असून शुभम सुखरूप घरी आणल्याबद्दल मोदींजींचे विशेष आभार मानले. यावेळी भाजप चे नेते मा हर्षवर्धनजी पाटील यांनी केलेल्या अमूल्य सहकार्या बद्दल शुभम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी युवा वारियेर्स पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक प्रशांत गलांडे-पाटील, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमकुमार जगताप, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पवार,युवा कार्यकर्ते पृथ्वीराज जगताप उपस्थित होते.