मेल्यावरही आपल्या तिरडीला विसावा देतात!

मेल्यावरही आपल्या तिरडीला विसावा देतात!”*
सगळं आयुष्य धावपळीत गेलं, शेवटी जाताना शेवटचा निरोप द्यायला जे जिवलग स्नेही नातेवाईक आप्तेष्ट आलेले असतात त्यांच्या सोबतचा शेवटचा विसावा असतो तो…
स्मशानभूमीच्या थोडं अलीकडे तिरडीला जमिनीवर टेकवून देतात,
सोबत भाकरीचा घास तुकडा असतो,
का तर जिवंतपणी कुठेही प्रवासाला जाताना वाटेत भूक लागली तर खायला शिदोरी सोबत ठेवायचास… आता आयुष्यातील तुझा हा शेवटचा प्रवास आहे आणि ही शेवटची तुझ्या सोबत असणारी शिदोरी!
त्यामुळे दोन क्षण उसंत घे आणि शिदोरी खा आणि कायमस्वरूपीचा रामराम कर तुझ्या ह्या शरीर रुपी प्रवासाला…
आयुष्यभर जे शौक पाणी केलं ते सर्व ठेवलं जातं विसाव्याच्या ठिकाणी…
का तर शेवटच्या विसावा तुझ्या आवडत्या गोष्टी सोबत घ्यावास म्हणून …
थोडक्यात काय तर मित्रांनो, मेल्यावरही विसावा मिळतो, जाळायच्या अगोदर!
तर मग जिवंतपणी इतकी सगळी धावपळ, मरमर सुरु आहे तेव्हा मनाचा, शरीराचा थकवा दूर करण्यासाठी जरासा विसावा घ्यायला काय हरकत आहे.?
जिवंतपणी हा विसावा घ्यायचं ठिकाण असते ते म्हणजे जिवलग मित्रांचं… मित्र म्हणजे एनर्जी बूस्टर असतात,
कसल्याही परिस्थिती *मैं हु ना* म्हणून जगायला बळ देत राहतात..

आपल्या आयुष्यातील अनेक सुख दुःख आपण आपल्या जवळच्या मित्रांशी बोललो तर मन हलकं आणि रिफ्रेश होते आणि ह्या जिवलग मित्रांचा विसावा प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. अगदी कधीही कसलीही परिस्थिती आली तरीही सरतेशेवटी पर्यन्त सोबत असणारा साथ देणारा , तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा , तुम्हाला ऐकून घेणारा तुम्हाला समजून घेणारा.. तो मित्रमैत्रिणींचा विसावा असला की, आयुष्यात कसल्याही संकटांना समोर जायला बळ येतं, आपल्या आयुष्यातील छोट्यातला छोटा आनंद द्विगुणित होतो, मनाला, शरीराला जेव्हा एकटे एकटे वाटतं न तेव्हा आपल्या मित्रांच्या काफ़िल्यात गेलं की अगदी रिलॅक्स वाटतं!

आज आयुष्य नक्कीच खूपच धावपळीचे झाले आहे, यात प्रश्नच नाही. पण ह्याच धावपळीत शरीरासोबत मनही थकत असतं. मनालाही विसावा हवा असतो आणि तो विसावा असतो आपलं जिवलग मित्र, आप्तस्नेही, त्यांच्यासोबत घातलेले सगळे क्षण.
आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला लावतात इतके सुंदर ते असतात…

शेवटचा घास तुकडा आपल्या नावाने रस्त्यावर ठेवला जातो, तोच आपण आज ह्या क्षणी जिवंत आहोत तेव्हाच मित्रांसोबत जेवलो तर चार घास नक्कीच जास्त जातात..
*आपल्या आवडत्या सगळ्या गोष्टी, सगळे शौक जिवंत आहोत तोपर्यंत इथेच जरासा विसावा घेऊन जगून घ्यायला काय हरकत आहे? नंतरचा विसावा फील करून घ्यायला कुठे आपल्या फिलिंग्स जिवंत असणार आहेत..?*
🙏🌹🙂🙂🙂🌹