👉👉केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोरोना पॉझिटिव्ह,👉बड्या नेत्यांना संसर्ग सुरुच*

*👉राज्यातील बड्या नेत्यांना कोरोना संसर्ग होण्याची मालिका सुरुच आहे. राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचं समोर आलं आहे.रावसाहेब दानवे यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. स्वत: ला आयसोलेशन करुन घेतलं असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. तर, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी साहेब लवकर बर व्हा, असं म्हटलंय.तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.*

*👉कोरोनाची लक्षण जाणवल्यानं चाचणी*

*केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षण जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दानवे यांनी ट्विट तसेच फेसबुक पोस्ट केलीय. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत असून संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केलंय.*

*👉👉साहेब लवकर बरे व्हा, 👉सदाभाऊ खोत*

*रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी रावसाहेव दानवे यांना लवकर बरे व्हावं, असं म्हटलंय. तर, राज्यातील जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव आपल्या पाठिशी असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.*

*👉केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार देखील कोरोना बाधित*

*केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्या विलगीकरणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात घेत आहेत.*

*👉महाराष्ट्रात 40 हजार कोरोना रुग्णांची नोंद*

*महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!