Fri. Mar 1st, 2024

इंदापूर तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने ना. प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन

इंदापूर तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने ना. प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन

उपसंपादक :- शिवाजी पवार

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्याचे निवेदनावरील सर्व मागण्या विधानसभेमध्ये व विधानपरिषदेमध्ये आक्रमकपणे मांडून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन विरोधी पक्षनेते ना. प्रवीण दरेकर यांनी दिले.

प्रवीण दरेकर हे सोलापूरचा दौरा करुन परत जात असताना इंदापूर येथे वीरश्री मालोजीराजे चौक याठिकाणी इंदापूर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी ते निवेदनकर्त्यांना बोलताना वरील वक्तव्य केले.

या निवेदनामध्ये कोपर्डीच्या आरोपींना न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसह, प्रामुख्याने करण्यात अाल्या तसेच मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार व विरोधी पक्षाने एकत्रितपणे प्रयत्न करावे या प्रमुख मागण्या होत्या त्याच बरोबर मराठा समाजास आरक्षण स्थगिती ऊठे पर्यंत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची नोकरी भरती करु नये तसे झाल्यास ते अन्यायकारक होईल, मराठा आरक्षणाचा ज्या युवकांना लाभ झाला आहे. अशा युवकांना तात्काळ नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ५०० कोटींची तरतूद करण्यात यावी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृह निर्माण करण्यात यावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी पवन घोगरे, प्रवीण पवार, भारत जामदार, राम आसबे, सचिन सावंत, सचिन जाधव, सुभाष दिवसे, श्रेयश नलवडे, भागवत बोडके, नवनाथ गुंड, शिवराज बोबडे यांसह अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.

==================================

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

Related Post

error: Content is protected !!