मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा पत्रकारांनी लाभ घ्यावा – राजकुमार थोरात

इंदापूर तालुका प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले

मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापननिमित्त जंक्शन येथे इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री निलकंठेश्‍वर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने गुरुवार (ता.3) रोजी सकाळी ९ वाजता पत्रकार व त्यांच्या कुंटूबाची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराचे उदघाटन माेहोळचे आमदार यशवंत माने व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून निलकंठेश्‍वर हॉस्पिटमधील तज्ज्ञ डॉ.सचिन घोरपडे, डॉ.योगेश पाटील, डॉ.अतुल बोरोडे, डॉ.केशव जायभाय, डॉ.रणजित कदम, डॉ.गणेश पानसरे हे पत्रकार व त्यांच्या कुंटूबाची मोफत तपासणी करणार असून इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंदापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष राजकुमार थोरात यांनी केले आहे.

*मोफत तपासणीच्या चाचण्या…*
ईसीजी, हिमोग्राम (हिमोग्लोबीन, प्लेटलेट काउंट, रक्तातील पांढऱ्या पेशी,लाल पेशीचे प्रमाण व रक्ताच्या इतर सुमारे दहा प्रकारच्या चाचण्या) रक्तातील साखर, रक्तदाब व तज्ज्ञ डॉक्टराकडून मोफत तपासणी व सल्ला.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!