*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, इंदापूर*
पुणे शहरातील एका १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शिक्षणाच्या माहेरघरात माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही घटना. आणि त्यानंतर साकिनाका येथील ३३ वर्षीय महिलेवर आत्याचराची घटना., या घटनेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी व महाराष्ट्र भरात वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कारवाई व्हावी, लवकरात लवकर शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा आणि या घटनेतील बलात्कारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे.
तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले. नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अभाविप कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारला केली आहे.आणि तहसीलदार कार्यालय समोर महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध निषेध करण्यात आला. या झोपलेल्या राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ इंदापूर शहर सहमंत्री याने घोषणा दिल्या, त्यावेळी सहमंत्री भरत आसबे,ओंकार हिंगमिरे,प्रथमेश पिसे, स्वप्निल भंडलकर,श्रीकांत चिंगळे,चैतन्य माळशिकारे,अजित गायकवाड ,पांडुरंग तात्या शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होतें.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!