IND v ENG*
*👉👉हिंदुस्थानने इंग्लंडचा157 धावांनी धुव्वा उडवला, 👉ओव्हलवर 50 वर्षांनी हिंदुस्थानने विजयी झेंडा फडकला*
*👉हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लंडनच्या ओव्हल मैदानावर चौथा कसोटी रंगला. रोमहर्षक झालेल्या या लढतीत हिंदुस्थानने यजमान संघाचा 157 धावांनी धुव्वा उडवत विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.विशेष म्हणजे 50 वर्षानंतर हिंदुस्थानच्या संघाने ओव्हलच्या मैदानावर कसोटी सामना जिंकला आहे.*
*👉रोरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी इंग्लंडला शतकी सलामी दिली. शार्दूल ठाकूरने बर्न्सला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर इंग्लंडचा डाव कोसळला. एकामागोमाग एक गडी बाद होत गेले.अखेर इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला आणि हिंदुस्थानने विजय मिळवला. हिंदुस्थानकडून उमेश यादवने सर्वाधिक 3, बुमराह, ठाकूर आणि जाडेजाने प्रत्येकी 2 बळी घेतले.*