महाराष्ट्रात ‘या’ वेळेत पुन्हा लागू होणार संचारबंदी? 👉जाणून घ्या!*

*👉👉केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात केंद्राने काही सूचना देखील केल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा संचारबंदी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.*

*👉केरळमध्ये सध्या सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्ण सापडत आहेत, त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. त्यामुळे जास्त संसर्गदर असलेल्या भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे.*

*👉महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं केलेली सूचना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.*

*👉केरळमध्ये सलग दोन दिवस 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण वाढले आहेत, तर 1 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील 41 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर आहे.*

*👉केरळ आणि महाराष्ट्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.*

*👉कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाचा प्रसार वाढत असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली.*

*👉कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळ आणि महाराष्ट्राने अधिक प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जास्त संसर्गदर असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा जास्त प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील भागात रात्रीची संचारबंदी लावली जाणार का? हे पाहावं लागेल.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!