अभाविप इंदापूरच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अभाविप इंदापूरच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर च्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदापूर शहर व विविध ग्रामीण भागामध्ये भारत माता प्रतिमापूजन व झेंडावंदनाचे कार्यक्रम झाले.
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष अभाविप वर्षभर विविध उपक्रमाने साजरे करणार आहे. पडस्थळ येथील जि. प.प्रा. शाळेमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली, शिक्षक व विद्यार्थ्यांना भारत माता प्रतिमा वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 14 ऑगस्ट रोजी संध्या इंदापूर येथे एक शाम देश के नाम या उपक्रमांतर्गत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी अभाविप पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत सहसंयोजक सौरभ शिंगाडे, विस्तारक गोरखनाथ केंद्रे, इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण, जिल्हा अभियान प्रमुख अवधूत बाचल, ओंकार हिंगमिरे, निलिषा देशपांडे, रुची जकाते इ. विद्यार्थी-विद्यार्थिनी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचे अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण यांनी आभार मानले.