मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्री एम.डी. शेख यांचा सत्कार

मुंबई – मुंबई मराठी पत्रकार संघाची स्थापना सन 1941 ची. अनेक दिवसांपासून मोबाईलवर चर्चा व्हायची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री एम डी शेख ,सरचिटणीस श्री अरुणकुमार एस. मुंदडा व कार्यकारीनी सदस्य तथा पुणे जिल्हा अध्यक्ष संदेश शहा यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. तेव्हा संघाचे अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे यांच्याशी मुंबई बरोबरच राज्यातील पत्रकारांचे विविध अडचणीवर चर्चा केली . लॉक डाऊन च्या कालावधीमध्ये केवळ अधिस्विकृतीधारक पत्रकारांनाच मुभा असते ते सरसकट पत्रकारांना सवलती हव्यात ,सर्व पत्रकारांचा विमा राज्य शासनानेच उतरविला पाहिजे ,कोरोनाने दगावले गेलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या पीआयबी विभागाकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली ती राज्य शासनाने सुद्धा मदत जाहीर केली पाहिजे ,राज्यातील अनेक पत्रकारांवर हेतुपूर्वक हल्ले केले जातात त्यामुळे पत्रकारांना राज्यशासनाने संरक्षण द्यावे ,हल्ले करणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावेत ,पत्रकारांना निवृत्तीनंतर पेन्शन योजना चालू झाली पाहिजे ,मुंबई येथे लोकल रेल्वेचा प्रवास करण्यासाठी अधिस्वीकृती धारक पत्रकारां प्रमाणेच सर्व सरसकट पत्रकारांना लोकल रेल्वे प्रवासाची सोय असली पाहिजे अशा अनेक प्रश्नांवर प्रदीर्घ चर्चा झाली . यावर एकसंघ होऊन मात करण्यासाठी एक मत झाले . तेव्हा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री एम डी शेख यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार केला . यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अरुणकुमार एस. मुंदडा ,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारी सदस्य तथा पुणे जिल्हाध्यक्ष डॉ संदेश शहा ,पत्रकार संजय धोत्रे व पत्रकार संघातील इतर मान्यवर उपस्थित होते .

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!