राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली अमित शाहांची भेट ,
राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून १२ खासादारांच्या नियुक्तीवरुन चर्चेत असणाऱ्या कोश्यारी यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय झालेला नाही.
याच पार्श्वभूमीवर या भेटीकडे पाहिलं जातं आहे.
कोश्यारी आणि शाह यांची भेट रात्री झाल्याची माहिती ए.एन.आय.ने दिली आहे.
मात्र या भेटीदरम्यान नक्की कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही ठीकठाक नसले तरी विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींच्या प्रस्तावावर ठरावीक काळात निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे,
ते त्यांनी विनाविलंब पार पाडावे, असा सल्ला मे.उच्च न्यायालयाने दिला.
त्याच दिवशी सायंकाळी दिल्लीत ही भेट पार पडल्याने या विषयावर चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जात आहे .

error: Content is protected !!