स्वप्नील लोणकर आत्महत्येच्या निषेधार्थ इंदापूर अभाविपची निदर्शने.*

*स्वप्नील लोणकर आत्महत्येच्या निषेधार्थ इंदापूर अभाविपची निदर्शने.*

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर यांच्या वतीने स्वप्निल लोणकर या तरुणाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ आय कॉलेज इंदापूर च्या समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
स्वप्नील लोणकर हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता, पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे व कुचकामी धोरणामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाचा बळी गेला आणि या सर्व प्रकाराला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे ,असा घणाघात अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण यांनी केला. यापुढे तरी कोणत्याही विद्यार्थ्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून सरकारला जागे करण्यासाठी
अभाविप सहमंत्री अवधूत बाचल यांनी घोषणाबाजी करून राज्यसरकार वरती निशाना साधून तीव्र निषेध व्यक्त केला.
या वेळी अभाविप इंदापूर सहमंत्री भरत आसबे, दीपक जमदाडे व चैतन्य माळशिकारे इ.उपस्थित होते.