*ऊसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतमालाला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही, पण बाजारात मात्र साखरेचे, दुधाचे, तरकारी चे भाव गगनाला भिडले आहेत.*

*त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना नाही. आजचा शेतकरी त्यामुळे तर कर्जबाजारी आहे. एका बाजूला ग्राहकांची लूट तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची लूट असली लुटारू व्यवस्था निर्माण करणारे राज्यकर्ते आणि व्यवस्था मोडण्याचे संकल्प केलेली “शिवशाही शेतकरी संघटना.”*

*सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेल्या संस्था या शेतकऱ्यांच्या असण्याऐवजी सहकार आणि साखर सम्राटांच्या कधी झाल्या हे समजलेच नाही. तिथला सभासद शेतकरी म्हणजे मालक ना!*
*पण आजच्या काळात मालकच नोकरांना आणि विश्वस्तांना विनंती करतो. त्यांच्या हातापाया पडतो. माझा ऊस तोडून न्या, माझे दूध घ्या ही परिस्थिती कुणी आणली. इतकी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची कोणी केली. शेतकऱ्यांना देशोधडीला कोणी लावले ? या सर्वांची उत्तरे शोधण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपण “शिवशाही शेतकरी संघटने”ची स्थापना केली आहे.*

*सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चुलीपर्यंत नाती जोडून शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचे उद्योग अनेक वर्षापासून सुरू आहेत. परंतु ऊस तोडणीचा हंगाम आला. की शेतकरी संघटना जाग्या होतात. तर कधीमधी दुधाच्या दराबाबत आवाज उठवतात. पण खरेच त्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळतो का ?*
*हा न्याय मिळवायचा असेल तर शिवशाही शेतकरी संघटनेत सामील व्हा.*

*संस्थापक अध्यक्ष*
*मा.नितीन (दादा )आरडे*
*शिवशाही शेतकरी संघटना*
*महाराष्ट्र राज्य*
*. मो.9665551000*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!