##आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस## ####पीपल्स रिपब्लिकन पार्टी####च्या वतीने उजनी धरण तरटगांव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे ,
1)इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे .
2)उजनी धरण ग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळालेल्या जमिनी तेथील गाव गुंडांनी शेतकऱ्यांना धरणग्रस्तांना वहिवाट होऊ दिले नाही त्यांना दमदाटी करून त्या जमिनी परत खरेदी करून घेतली आहे त्या जमिनीच्या खरेद्या रद्द करून त्या जमिनी धरणग्रस्तांना परत करण्यात याव्यात .
3)मराठवाड्यासाठी उजनी धरणामध्ये 21 टीएमसी ची केलेली तरतूद रद्द करावी.
4) उजनी धरणा मधून मराठवाड्यासाठी जाणारा महाकाय बोगदा बंद करण्यात यावा. या अनेक मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे ,या आंदोलनाला इंदापूर तालुक्यातून अनेक पक्ष संघटना यांचा चांगला प्रतिसाद पाठिंबा मिळत आहे, त्याबद्दल आभारी आहे परंतु ज्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी इंदापूर तालुक्याला राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या पाच टीएमसी पाण्याला विरोध करून ते पाणी कॅन्सल करण्यात सोलापूर करांना यश मिळाले, मला या सोलापुरातील लोकप्रतिनिधी व आंदोलकांना एक प्रश्न विचारायचा आहे ,मराठवाड्याचं उजनी धरणासाठी काही योगदान नसताना मराठवाड्यासाठी केलेली 21 टीएमसी ची तरतूद रद्द करावी अशी मागणी सोलापूर कारण कडून केलेली दिसून आली नाही, त्यानंतर जो मराठवाड्याला जाणारा महाकाय बोगदा याला ही यांनी विरोध केला नाही ,मला सोलापूर आणि पुणे जिल्हा यातील सर्व शेतकऱ्यांनाएक विनंती करायची आहे ,हा जो मराठवाड्याचा बोगदा आहे हा बोगदा धरण मायनस झाल्यानंतर सुद्धा चालू शकतो एवढी खोलीची परवानगी या बोगद्याला कशी देण्यात आली विशेष म्हणजे या बोगद्याला गेट उपलब्ध नाही त्यामुळे या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापुढे पाण्यासाठी झगडावे लागणार आहे या बोगद्याला खरं तर सोलापूर जिल्ह्यातून विरोध होणे गरजेचे असताना, त्या ठिकाणाहून सोलापुरातील जिल्ह्यातील एकही नेता किंवा शेतकरी संघटनेचा नेता बोलला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे येणाऱ्या काळात या बोगद्या साठी सर्वांनी एकत्र येऊन या बोगद्याचे काम बंद करण्यासाठी पुढे आले पाहिजे ,आंदोलन स्थळी ज्यांच्याकडे या बोगद्याचे काम आहे त्यातील एका अधिकारी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली नीरा नदी मधून सात टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये बोगद्याद्वारे आणणार आहे ते पाणी आम्ही मराठवाड्यासाठी येणार आहोत बांधवांनो आपणा सर्वांना माहिती आहे नीरा नदीमध्ये पावसाळा सोडला ते कधीही पाणी उपलब्ध नसतं इंदापूर तालुक्यातील 22 गावे त्यांना नीरा नदी जवळ आहे नीरा नदीला जर पाणी उपलब्ध असतं तरी या गावांची हालत कधी वाईट झाली नसती हे शेतकरी देशोधडीला लागले नसते परंतु तो अधिकारी चुकीची माहिती आम्हाला याठिकाणी देत होता शासनाला एका अधिकाऱ्याने नीरा नदीत सात टीएमसी पाणी शिल्लक असलेला अहवाल सादर करून खोटी माहिती पुरवून आज निरा- उजनी धरणाच्या बोगदा हजारो कोटी रुपयांचे नुकसान या अधिकाऱ्याच्या अहवालामुळे झालेला आहे, अशा अधिकाऱ्यावर खरंतर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे नीरा नदीच्या पाण्याच्या नावाखाली हा मराठवाड्याचा बोगदा आपल्या उजनी धरणातील आपल्या हक्काचे पाणी हे घेऊन जाणार आहे ,आपण सर्वांनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचे आहे ,अन्यथा आपल्याला भविष्यात आपल्या भागात उजनी धरण असुनसुद्धा आपला भाग वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही ,यासाठी आणि भविष्यात आपण सर्वजण मिळून या मराठवाड्यासाठी जाणारा बोगद्याचे काम बंद करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करावे लागेल, सरपंच पोपट माने, उपसरपंच दादासो भांगे,मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच अॅड सचिनजी राऊत अॅड करे साहेब यांनी ही आंदोलनामध्ये ज्या कायदेशीर मदत लागेल ती करायला तयार असल्याचे जाहीर केले त्याबद्दल धन्यवाद,मा.अनिल आण्णा पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल धन्यवाद, तसेच मा.नेताजी लोंढे,मा.महेशजी लोंढे ,सणसरचे चव्हाण साहेब व त्यांचे सहकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला ,बाभुळगांव चे युवा नेते सुभाष डरंगे व त्यांचे सहकारी, संजय नाना सोनवणे, दस्तगीर नायकुडे,गोरख सोनवणे प्रदिप राकुंडे, विजय सोनवणे, बाळासाहेब ननवरे,वामण सोनवणे, शिवाजी मखरे,बापू सोनवणे, महेश सरवदे,रूईदास पवार,आगंद गायकवाड, बाबासाहेब झेंडे,किसन चौगुले,पिंटूशेठ घोडके आंदोलनाला उपस्थित राहुन पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ,त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर शेतकरी हिताच्या मागण्यांचा विचार करावा आणि इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा बाळगतो .
आपलाच .
मा.संजय भैया सोनवणे.
अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
मोबाईल नंबर 99 75 51 7000