वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पत्रकारांचा स्तुत्य उपक्रम.

इंदापूर :

सध्या सर्वत्र कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव आहे. या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा न करता, केक, पार्टीचे आयोजन न करता उद्भवलेल्या परिस्थितीचे भान ठेवून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत समाजासमोर एक आदर्श ठेवला.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे खजिनदार अंगद तावरे तसेच सदस्य नानासाहेब घळके यांचा वाढदिवस होता. याचे औचित्य साधत माऊली अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डाॅ. संदेश शहा, शहराध्यक्ष सुरेश जकाते, संपादक विलासराव गाढवे, सचिव धनंजय कळमकर तसेच अॅड. नारायण ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर येथील माऊली बालक अनाथाश्रमात जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप केले.

यावेळी समन्वयक दिपक खिलारे, सदस्य कैलास पवार, श्रेयश नलवडे, हमीद आतार, माऊली नाचण उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!