इंदापूर तालुक्यातील आजची कोरोनाची आकडेवारी…!

नमोन्यूजनेशन

आज दिनांक १५ मे रोजी इंदापूर तालुक्यात कोरोनाचे २२६ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील २०३ रूग्ण आढळले असून , शहरी भागात २३ रूग्ण आढळून आले असल्याची माहिती इंदापूरचे तहशिलदार अनिल ठोंबरे यांनी दिली .

त्यापैकी ग्रामीण भागातील १६१ व शहरी भागातील ३८ असे एकूण १९९ रूग्ण बरे होऊन घरी आले आहेत.

तर ग्रामीण भागातील ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे .

तालुक्यातील जनतेने शासकीय नियमांचे कडक पालन करून सुरक्षित रहाण्याचे आवाहन तहशिलदार ठोंबरे यांनी केले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!