कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना?👉 ‘या’ वयोगटातील मुलांसाठी धोक्याची घंटा*

*नागपूर – कोरोनाची पहिली लाट पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी जीवघेणी ठरली तर दुसऱ्या लाटेने २० ते ५० वयोगटातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात विळख्यात घेतले आहे. आता तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त होत असून या लाटेचा सर्वाधिक धोका १२ ते १८ वयोगटातील मुलांना होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे. विशेष असे की, राज्यभरात पेडियाट्रिक तसेच न्युओनेटल व्हेंटिलेटरची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. तसेच बालरोग तज्ज्ञांचा सल्ला राज्य शासनाने घ्यावा असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.*

*👉कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे चार हजारांवर मृत्यू झाले. यात जेष्ठांची संख्या ८५ टक्के होती. मात्र, २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार पसरला. २० वर्षाच्या वरील तरुण बाधित होण्याचे प्रमाण वाढले. शासनाने आता १८ वर्षापर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. मात्र, राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसऱ्या लाटेत बाधित होतील, असा अंदाज व्यक्त होत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.*

*👉राज्याच्या आरोग्य विभागानेही तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध उपाययोजनादृष्टीने सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल नागपूर महानगरपालिका कितपत घेईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपूर जिल्ह्यात २१ ते ४० वयोगटात सुमारे ९०० तरुण रुग्णांचे बळी गेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांमध्ये समज पसरला होता. याशिवाय मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, असे मनावर बिंबवण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विळखा ज्येष्ठांसोबतच तरुणांना पडला. यात नागपुरात नव्या रुपातील पाच स्ट्रेनमुळे हे घडल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रत्येक जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालयासह सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलांसाठी कोविड काळजी कक्ष तयार ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पेडियाट्रिक व्हेंटिलेटर तसेच निओनेटल व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे, असे तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले.*

*👉तिसऱ्या लाटेचे संकेत जागतिक पातळीवर दिले गेले आहेत. लसीकरणात आता १८ वर्षांपुढील सर्वांनाच संरक्षण मिळत आहे. मात्र, यात लसीकरणाच्या कक्षेत सद्यातरी लहान मुले नाहीत. मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते, परंतु प्राथमिक स्तरावर सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये.*
*👉डॉ. प्रशांत पाटील , विभाग प्रमुख मेडिकल*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!