रामनवमी चे औचित्य साधून बाभूळगाव येथे वृक्षारोपण.

रामनवमी चे औचित्य साधून बाभूळगाव येथे वृक्षारोपण.

इंदापूर : प्रतिनिधी

बाभूळगाव (ता.इंदापूर ) येथे वृक्षारोपण ही काळाची गरज लक्षात घेऊन प्रभू श्रीराम (रामनवमी) चे औचित्य साधून युवानेते प्रेमकुमार जगताप मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

वाढत्या कोरोनामुळे रामनवमी उत्सव सर्वत्रच अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. तरी पण या सर्व रामभक्तांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपणाचा स्तुत्य असा उपक्रम घेऊन युवकांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.

या उपक्रमासाठी युवा नेते प्रेमकुमार जगताप, वैभव देवकर, भरत आसबे, दीपक जमदाडे, अवधूत बाचल आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.