3561dca1502d4f0dbd988186132200953561dca1502d4f0dbd98818613220095

इंदापूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी महाविद्यालय इंदापूर येथील प्राध्यापक व चेतना फाऊंडेशन चे खजिनदार  सोमनाथ माने सर यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकॅडमी यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाची व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाची भूमिका ही डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेली आहे. आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रति असलेल्या कृतर्थ भावनेने त्यांच्या नावाने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ही भूमिका थोर इतिहास तज्ञ डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी मांडली. जर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मा.दत्तात्रय सावंत साहेब आय.आर.एस मा. विपुल वाघमारे साहेब माननीय श्री गणेश माने देशमुख साहेब चेअरमन जय हिंद सहकारी साखर कारखाना मा.शिवाजी खांडेकर मा. रावसाहेब मिरगणे मा. सौ श्रीलेखा पाटील मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा.महेश आप्पा शिंदे व योगेश निंबाळकर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जवळपास 30 गुणवंत शिक्षकांना श्रीमंत छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. आपल्या मनोकातामध्ये श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजासाठी सुरू केलेल्या विविध शाळा महाविद्यालय आश्रम शाळा यांची माहिती दिली तसेच पुढच्या पिढीला घडवायचे असेल तर शिक्षक हाच एकमेव पर्याय आहे हे त्यांनी कणखरपणे सांगितले व उपस्थित सर्व गुणवंत शिक्षकांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.औदुंबर लोंढे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक सोमनाथ गोडसे यांनी केले सदर कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह, रयत प्रकाशन, गिरी प्रेमी ग्रुप पुणे यांनी केले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!